देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

  1. मुंबईसह उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस; वरळी, परळ, दादर, सायन, वांद्रे, अंधेरी सबवे, मालाडमधील सखल भागांत पाणी


 

  1. मुसळधार पावसामुळे मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेसेवा ठप्प; सीएसएमटी ते ठाणे, सीएसएमटी ते वाशी आणि चर्चगेट ते अंधेरी दरम्यान लोकल सेवा रद्द


 

  1. मुंबई शहरासह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस, येत्या 24 तासांत मुंबई, ठाणे, पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा


 

  1. मुंबईसह कोकण मराठवाड्यातही पावसाचं थैमान, लातूर, बीड, परभणी, हिंगोलीमधील शेतशिवारात पाणी; कोकणात भातशेती आणि पोफळीचं मोठं नुकसान


 

  1. भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 33 वर, ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती; गेल्या 50 तासांपासून बचावकार्य सुरुच


 

  1. आर्थिकदृष्ट्या दूर्बल घटकांसाठीचे लाभ एसईबीसी प्रवर्गाला, मराठा समाजाला दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न


 

  1. सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्स प्रकरणात दिया मिर्झाचं नाव समोर, तर "कधीचं ड्रग्ज न घेतल्याचं" दियाचं स्पष्टीकरण


 

  1. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीचा भायखळा जेलमधील मुक्काम वाढला, 6 ऑक्टोंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी


 

  1. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मार्च ते जूनदरम्यान एक कोटी मजुरांनी पायी घर गाठलं, सरकारची संसदेत लिखित माहिती


 

  1. राजस्थान रॉयल्सची विजयी सुरुवात, चेन्नई सुपर किंग्सचा 16 धावांनी पराभव; राजस्थानच्या संजू सॅमसन, स्टिव्ह स्मिथ आणि जोफ्रा आर्चरची तुफान फटकेबाजी