देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

  1. कोरोना गेलेला नाही, दुसरी लाट नव्हे त्सुनामी येईल अशी भीती; पुन्हा लॉकडाऊन टाळायचं असेल तर नियम पाळा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन


 

  1. येत्या 8 ते 10 दिवसांत परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती


 

  1. वाढीव वीज बिलांविरोधात मनसेचं ठाकरे सरकारविरोधात आंदोलन, तर ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात भाजप राज्यभर वीज बिलाची होळी करणार


 

  1. ग्रामीण भागात नववी ते दहावीसाठी बहुतेक शाळा सुरु, पालकांच्या भूमिकेकडे लक्ष; तर लस येईपर्यंत शाळा बंद ठेवण्याची आमदार कपिल पाटील यांची मागणी


 

  1. पदवीधर निवडणुकांनंतर महाराष्ट्रात सत्तांतरासाठी हालचाली, जालन्यातील मेळाव्यात विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांचं सूचक वक्तव्य


 

  1. भाजप नेते विखे पाटलांना शिवसेनेची ऑफर; अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याने राजकीय भूकंप


 

  1. जम्मू काश्मीरच्या सांबामध्ये 150 मीटरचं भूयार सापडलं, नगरोटात मारले गेलेले दहशतवादी भूयारातून आल्याचा संशय


 

  1. तिसऱ्यांदा समन्स बजावूनसुद्धा अभिनेत्री कंगना रनौत मुंबई पोलिसांसमोर हजर होणार का याकडे लक्ष; हजर न झाल्यास अजामीनपात्र अटक वॉरंट अटळ


 

  1. आता मला कळलं भारती-हर्ष लग्नात इतकी कॉमेडी कशी करत होते; विनोदवीर राजू श्रीवास्तव यांचा उपरोधिक टोला


 

  1. अमेरिकन राजकारणात भारतीयांचं वर्चस्व, जो बायडेन यांच्या पत्नीची धोरण संचालक म्हणून माला अडीगा यांची नियुक्ती