देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. केंद्र सरकारकडून रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ; गहू, हरभरा, मसूर, मोहरी, ज्वारी, सूर्यफुलासह सहा पिकांच्या एमएसपी वाढीला मान्यता


2. भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 20वर, बचावकार्यादरम्यान रात्री सात मृतदेह बाहेर काढले, तर 25 जणांना वाचवण्यात यश


3. मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यासाठी राज्य सरकारचा सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज, मुख्यमंत्री सविस्तर भूमिका मांडण्याची शक्यता, अशोक चव्हाणांची माहिती


4. नवीन शैक्षणिक वर्षासाठी यूसीबीकडून मार्गदर्शन सूचना जारी, 1 नोव्हेंबरपासून पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम सुरु करण्याच्या सूचना


5. राज्यात सोमवारी नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा दुप्पट, दिवसभरात 32 हजार रुग्णांना डिस्चार्ज, तर 15 हजार 738 नव्या रुग्णांची नोंद


6. आज आणि उद्या मुंबई, ठाण्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, मराठवाड्यातील पावसामुळे सोयाबीन, मूग, उडिदसह इतर पिकांचं मोठं नुकसान


7. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह तिघांवर गुन्हा, लोकल सुरु करण्यासाठी केलेल्या सविनय कायदेभंगप्रकरणी कर्जत लोहमार्ग पोलिसांची कारवाई


8. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं साताऱ्यात निधन, 'आई माझी काळुबाई' मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान आशालता यांना कोरोनाची लागण


9. ड्रग्ज चॅटमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोन, नम्रता शिरोडकरचंही नाव एनसीबीच्या सूत्रांची माहिती, जया साहाच्या कंपनीची मॅनेजर करिष्मासोबतचं दीपिकाचं चॅट समोर


10. रॉयल चॅलेन्जर बंगलोरची हैदराबाद सनरायझर्सवर मात, पदार्पणाच्या सामन्यात देवदत्त पड्डिकलेचं अर्धशतक तर आज राजस्थान रॉयल्सचा सामना चेन्नई सुपरकिंग्जशी