देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. आजपासून सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये पाच जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू, ब्रिटनमध्ये कोरोनाव्हायरसचा नवा प्रकार समोर आल्याने अलर्ट


2. न्यू ईयरच्या सेलिब्रेशनवर नाईट कर्फ्यूचं सावट, हॉटेल व्यावसायिक नाराज, आहार संघटनेचे पदाधिकारी शरद पवार यांची भेट घेणार


3. आज आणि उद्या संपूर्ण मुंबईत पाणीकपात, इंजेक्शन पॉईंटची दुरुस्ती करण्यासाठी 15 टक्के पाणीकपात करण्याचा महापालिकेचा निर्णय


4. गुन्हेगारीमध्ये देशात पाटण्यानंतर नागपूरचा क्रमांक, पहिल्या वीस शहरांमध्ये पुणे आणि मुंबईचाही समावेश


5. उंदराने देव्हाऱ्यातील पेटती वात पळवल्याने संपूर्ण घराला आग, अडीच लाखांच्या रोख रकमेसह घरालगतचा ऊसही जळला, करमाळ्यातील घटना


6. तलाठी भरती प्रकरणात मराठा उमेदवारांपेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवारांना नियुक्त्या देऊ नका, औरंगाबाद खंडपीठाचे आदेश


7. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना दिलासा, टॉप सिक्युरिटी कंपनीत आर्थिक गैरव्यवहार नाही, एमएमआरडीएचा अहवाल सादर


8. पत्नीने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पतीचा टोकाचं पाऊल, पश्चिम बंगालमधील भाजपचे खासदार सौमित्र खान यांच्याकडून पत्नीला घटस्फोटाची धमकी


9. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना फायझरच्या कोरोना लसीचा पहिला डोस, टीव्हीवर लाईव्ह प्रक्षेपण, सगळ्यांनी लस घेण्याचं बायडन यांचं आवाहन


10. देशात चार वर्षात बिबट्यांच्या संख्येत 60 टक्क्यांनी वाढ, भारताच्या पर्यटन विभागाचा अहवाल, ऊसाचे फड बिबट्यांसाठी ठरतायत नंदनवन