2. महाराष्ट्राचा राज्यकारभार उद्धव ठाकरेंनी हाती घ्यावा ही लोकांची भावना, संजय राऊत यांचं दिल्लीत वक्तव्य, राऊत सकाळी शरद पवारांना भेटण्याची शक्यता
3. शरद पवार आणि पंतप्रधान मोदींमध्ये पाऊण तास चर्चा तर पवारांच्या भेटीनंतर मोदी-शाहांमध्ये खलबतं, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचा पवारांचा दावा
4. कोल्हापुरातील शिरोळ, हातकणंगलेमध्ये ऊसदराचं आंदोलन चिघळलं, ट्रॅक्टर पेटवला, हमीभाव जाहीर झाला नसल्याने आक्रमक पवित्रा
5. शेती नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्राचं पथक आज महाराष्ट्रात, 5 सदस्यीय पथक 3 दिवस विभागवार पाहणी करणार, पंचनामे पूर्ण झाल्यावर केंद्राला अहवाल
6. बीपीसीएलसह पाच सरकारी कंपन्यांची भागीदारी सरकार विकणार, केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय, सगळ्यात मोठ्या खाजगीकरणाला हिरवा कंदील
7. संपूर्ण देशात एनआरसी लागू होणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची राज्यसभेत घोषणा, नागरिकत्व सिद्ध करणाऱ्यांनाच देशात जागा, शाहांचं वक्तव्य
8. शालेय विद्यार्थ्यांची ऑटो रिक्षातून वाहतूक करणं बेकायदेशीरच, अशा वाहतुकीला परवानगी देणार नाही, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती
9. वायू प्रदूषणात भिवंडी दिल्लीच्या वाटेवर; प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली, कारखान्यांमधून निघणारा धूर, रस्त्यावरील धुळीमुळे भिवंडीकरांना घराबाहेर पडणं कठीण
10. शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जब्बार पटेल यांची निवड, येत्या 15 डिसेंबरला अधिकृत घोषणा होणार