2. बहुमत नसतानाही स्थिर सरकार चालवून दाखवलं, युतीचं घोडं अडलेलं असताना नाशिकमध्ये मोदींचं सूचक विधान, तर राममंदिरावरून टीका करणाऱ्यांना बडबोल्यांची उपमा
3. 22 सप्टेंबरला अमित शाह मुंबई दौऱ्यावर, नारायण राणेंसह रखडलेले भाजपप्रवेश उरकण्याची शक्यता, शाहांच्या युतीसंदर्भातल्या भूमिकेकडेही लक्ष
4. मनसे विधानसभा निवडणूक लढणार की नाही याचा अद्याप सस्पेन्स, राज ठाकरेंच्या नेतृत्त्वात आज बैठक तर काँग्रेसची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता
5. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये नवा प्रयोग, पाच कार्याध्यक्षांच्या नियुक्तीनंतर आता विभागवार पाच प्रभारीही नियुक्त
6. वंचितशी घटस्फोट घेणाऱ्या एमआयएमकडून पुन्हा मनोमिलनाचे संकेत, जागांची तडजोड झाल्यास आघाडी शक्य, जलिल यांची भाषा बदलली
7. आरे हे जंगल नाही, केवळ हिरवळ दिसली म्हणजे ते जंगल होतं नाही, राज्य सरकारचा हायकोर्टात दावा, मेट्रो कारशेडला असलेला विरोध निराधार असल्याचं स्पष्टीकरण
8. मुंबईतल्या खड्ड्यांवरुन आरजे मलिष्काचे पुन्हा गाण्यातून फटकारे, मुंबईतल्या रस्त्यावर चंद्र उतरल्याचं म्हणत महापालिकेची खिल्ली
9. मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस आधीच जाहीर, तर दिवाळी बोनससह विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्याचा संपाचा इशारा
10. सोन्या-चांदीच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, सोनं प्रतितोळा साडे अडतीस हजारांवर, तर एक किलो चांदीचा दर 47 हजार रुपये