देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. पूरग्रस्तांना मदत जाहीर करण्यावरुन आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये खडाजंगी, थिल्लरबाजी नको मदत कधी जाहीर करणार, फडणवीसांचा सवाल
2. देवेंद्र फडणवीस यांचा आज मराठवाडा दौरा, तर प्रवीण दरेकर सोलापुरात; प्रकाश आंबेडकरही अक्कलकोट आणि इतर भागात पाहणी करणार
3. लोकल आता सर्वांसाठी सुरु करण्याबाबत सरकारने गांभीर्याने विचार करावा, हायकोर्टाचं मत; तर महिलांसाठी लोकल कधी सुरु करणार, राज्य सरकारचा रेल्वे बोर्डाला प्रश्न
4. पुणे विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेच्या वेळी सर्व्हर डाऊन, विद्यार्थ्यांना मनस्ताप; आज अमरावती विद्यापीठाची परीक्षा, तांत्रिक घोळाच्या भीतीपोटी विद्यार्थ्यांना धाकधूक
5. कोरोनामुळे कोल्हापुरातील यंदाचा शाही दसरा सोहळा रद्द करण्याचा निर्णय, इतिहासात पाहिल्यांदाच दसरा चौकात होणारा शाही सोहळा रद्द करण्याची वेळ
6. सिडकोच्या अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील घरांसाठी मुद्रांक शुल्क एक हजार रुपये होण्याची शक्यता; सिडको एमडींचं मनसे पदाधिकाऱ्यांना आश्वासन
7. नागपुरात एकाच दिवसात तीन हत्या, क्षुल्लक कारणांमुळे दोघांचं आयुष्य संपलं, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
8. जगातील पहिल्या कोरोना लसीच्या चाचणीला आयसीएमआरची मंजुरी, रशियाच्या स्पुटनिक लसीची 40 हजार भारतीयांवर चाचणी
9. शाहरुख आणि काजोलच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' चित्रपटाला 25 वर्ष पूर्ण, रोमॅन्टिक गाणी आणि अभिनयाची मोहिनी आजही प्रेक्षकांवर कायम
10. आयपीएलमध्ये राजस्थानची चेन्नईवर सात विकेट्सनी मात, जोस बटलरची नाबाद 70 धावांची खेळी; चेन्नईसाठी प्ले ऑफची संधी धूसर