देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. भारतीयांना एक हजार रुपयात कोविशिल्डचे दोन डोस मिळणार, सीरम इन्स्टिट्यूचे सीईओ अदर पुनावाला यांची माहिती, अंतिम चाचणीचे अहवाल सकारात्मक आल्यास तीन महिन्यात लसीकरणाला सुरुवात


2. सगळ्या प्रकारच्या खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये 30 टक्क्यांनी वाढ, पामतेलाचं उत्पादन घटल्याने दर कडाडले, मात्र पालेभाज्या आणि डाळी स्वस्त झाल्याने काहीसा दिलासा


3. कृषीपंपाच्या वीज बिलाच्या थकबाकीची रक्कम भरल्यास शेतकऱ्यांना 50 टक्के वीज बिल माफी मिळणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय


4. वाढीव वीज बिलाबाबत सोमवारपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा राज्यभर उग्र आंदोलन, मनसेचा सरकारला अल्टिमेटम, कॅबिनेट बैठकीत बिलाच्या मुद्द्यावर चर्चा मात्र निर्णय नाही


5. कोरोनामुळे स्थगित केलेला राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार, राज्य निवडणूक आयोगाची माहिती


6. कार्तिकी एकादशी प्रतिकात्मक पद्धतीने साजरा करण्याच्या प्रस्तावाला आळंदीच्या चोपदारांचं समर्थन, मात्र वारकरी संघटनांचा विरोध, आज महत्त्वाची बैठक


7. ऐरोली-मुंब्रा जलद मार्ग सप्टेंबर 2021 मध्ये खुला होणार, कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा मिळणार


8. सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता मिळण्याचे संकेत, केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचं सूचक वक्तव्य


9. अक्षय कुमारचा यू ट्यूबर राशिद सिद्दीकीविरुद्ध 500 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला, सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात फेक व्हिडीओ केल्याने अक्षयचं पाऊल


10. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला दहा वर्षांचा कारावास, बेकायदेशीर मार्गाने पैसा पुरवल्याचा आरोप, दहशतवादविरोधी न्यायालयाकडून शिक्षा