एबीपी माझाचं स्मार्ट बुलेटिन | 20 नोव्हेंबर 2019 | बुधवार


1. 25 नोव्हेंबरदरम्यान महाशिवाआघाडीचा शपथविधी, अब्दुल सत्तारांची माझाकडे एक्स्क्लुझिव्ह माहिती, शुक्रवारी तयारीनिशी आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश

2. नवी दिल्लीत आज आघाडीच्या नेत्यांची बैठक, पवार मात्र अनुपस्थित, तर २ ते ३ दिवसांत सत्तापेच सुटण्याची राष्ट्रवादीच्या सूत्रांची माहिती

3. बरं झालं युती तुटली म्हणत तरूण भारतमधून शिवसेनेवर टीकास्त्र, एनडीएतून बाहेर पडण्याची किंमत सेनेला मोजावी लागण्याचाही घणाघात

4. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारसीची गरज नाही, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण, सावरकरांना भारतरत्नसाठी समर्थनच, राऊतांचा पुनरूच्चार

5. ऊस दरासाठी सलग दुसऱ्या दिवशी सांगलीत स्वाभिमानीचं आंदोलन, मध्यरात्रीत 40 ट्रॅक्टर अडवले, वाहन मालक-स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली

6. गाडीचा हॉर्न वाजल्यानं खाजगी कंपनीच्या व्यवस्थापकाची हत्या, नागपुरातील धक्कादायक घटना, कुख्यात आरोपी अटकेत

7. ई चलानचा दंड न भरल्यास अटक होण्याची शक्यता, दंड भऱण्यासाठी वाहनचालकांना 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ

8. बंद असलेली मुंबई-पुणे तिसरी रेल्वे मार्गिका 15 जानेवारीला सुरु होणार, नव्या वर्षात मुंबई-पुणे प्रवास सुरळीत, मध्य रेल्वेचा दावा

9. बैलाची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमांवर भिगवन पोलिसांत गुन्हा, हत्येची घटना इंदापुरातल्या पोंदवडी गावची, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु

10. अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खानच्या 'तानाजी' या मोस्ट अवेटेड सिनेमाचा ट्रेलर रिलीज, शिवरायांच्या सिंहाची गाथा पडद्यावर, ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 20 नोव्हेंबर 2019 | बुधवार | ABP Majha