देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. रामजन्मभूमी न्यासाप्रमाणेच मशिदीसाठी वेगळा ट्रस्ट का नाही?, शरद पवारांचा सरकारला सवाल, हा देश सर्वांचा असल्याचाही भाजपला टोला
2 पीकविमा काढायचा की नाही हे आता शेतकरी ठरवणार, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मोदी सरकारचा निर्णय, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
3. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणूक शपथपत्र प्रकरणावर आज नागपूर कोर्टात सुनावणी, शपथपत्रात दाखल गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप
4. एल्गार परिषद प्रकरणाची कागदपत्रे अखेर पुणे पोलिसांकडून एनआयएला सुपूर्द, आरोपपत्रांचे दस्तावेज, हार्डडिस्क, पुराव्यांवर एनआयए पुढील तपास करणार
5. राज्य सरकार पावणे दहा लाख विद्यार्थ्यांना मोफत चष्मा वाटणार, चष्म्याचा नंबर बदलल्यास सरकारच खर्च करणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
6. हिंगणघाट जळीतकांडातील आरोपीने जेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा, तुरुंग प्रशासनाकडून मात्र वृत्ताचा इन्कार, 24 तास निगराणीखाली असल्याचाही दावा
7. चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील केसलाघाट इथे भरधाव कारची ट्रकला धडक, सहा जणांचा जागीच मृत्यू, 3 जण गंभीर जखमी
8. मुंबईत फ्लोरा फाऊंटन परिसरातील तीन झाडांना अॅसिडचं इंजेक्शन, झारा कंपनीच्या शोरुमसाठी वृक्ष तोडल्याचा आरोप, पर्यावरणप्रेमी संघटनेची 'झारा'विरोधात तक्रार
9. लग्नसराईमुळे सोन्याच्या दरात गेल्या आठ दिवसात 1 हजार 250 रुपयांनी वाढ, सोनं प्रतितोळा 41 हजार 750 रुपये, चांदीच्या दरातही दीड हजारांनी वाढ
10. टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्यातल्या पहिल्या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त रोहित शर्माऐवजी पृथ्वी शॉला संधी मिळण्याची शक्यता, विराट कोहलीचे संकेत