- देशातल्या सर्व शेतकऱ्यांना सहा हजारांचं वार्षिक अनुदान,नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय,शहीदांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीतही वाढ
- केंद्र सरकारचा अर्थसंकल्प 5 जुलैला,अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचं बजेट मांडणार,तर 19 जूनला नव्या लोकसभा अध्यक्षांची नियुक्ती
- सिलेंडरच्या दरात मध्यरात्रीपासून वाढ,अनुदानित सिलेंडर एक रुपया 23 पैशांनी महाग,गृहिणींचं बजेट कोलमडणार
- शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक,विधानसभेआधी मोठे फेरबदल होण्याची शक्यता,लोकसभेतील पराभवाचं चिंतन होणार
- अंदमानच्या समुद्रात ढगांची वर्दी,मान्सून दहा जूनपर्यंत कोकणात धडकण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
- पुणे ते मुंबई धावणार्या ऐतिहासिक डेक्कन क्वीनचा 90 वा वाढदिवस,एसटी महामंडळाची लाल परी 71 वर्षांची
- इडलीची चटणी बनवण्यासाठी चक्क टॉयलेटच्या पाण्याचा वापर,मुंबईतील बोरीवली स्टेशनवरचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात,ग्राहकांच्या जीवाशी खेळ
- मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये दहा टक्के पाणीसाठा शिल्लक,मात्र मुंबईकडे जुलै अखेरपर्यंत पुरेसं पाणी
- अमेरिकेतल्या वर्जिनियामध्ये माथेफिरुचा अंदाधुंद गोळीबार,महापालिकेच्या इमारतीवर हल्ला,11 जणांचा मृत्यू
- विंडीजच्या ओशाने थॉमस आणि जेसन होल्डरच्या भेदक आक्रमणासमोर पाकिस्तानचा अवघ्या 105 धावांत खुर्दा,विश्वचषकाच्या इतिहासात पाकची दुसरी निचांकी धावसंख्या