1. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आजपासून, गुरुकुंज मोझरीतून सुरुवात, महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर युतीचा निर्णय होण्याची शक्यता


2. आंध्र प्रदेशनंतर गोव्यातही भूमीपुत्रांना नोकऱ्यांमध्ये 80 टक्के आरक्षण देण्याच्या हालचाली, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विधानसभेत माहिती, महाराष्ट्रात प्रतीक्षा

3. 'ईव्हीएमबाबत हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोगाकडून कोणतीही आशा नाही', ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर कोलकात्यात राज ठाकरेंची उद्विग्न प्रतिक्रिया

4. वाहतुकीचे नियम मोडणं महागात पडणार, राज्यसभेत बहुचर्चित मोटर वाहन दुरुस्ती विधेयक मंजूर, विना हेल्मेटसाठी एक हजार रुपये दंड

5. खतांवरची 70 हजार कोटींची सबसिडी थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात, केंद्र सरकारचा निर्णय, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचीही संख्या वाढवणार



6. मुंबई विद्यापीठ विद्यार्थी परिषद निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर, 30 ऑगस्ट रोजी महाविद्यालयीन विद्यार्थी परिषद  तर 24 सप्टेंबरला विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची निवडणूक

7. बारामती सत्र न्यायाधीशांवर पत्नीचा कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप, हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना मदतीसाठी साकडं

8. तुलसी, तानसा, मोडकसागरपाठोपाठ विहार तलावही ओव्हर फ्लो, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 85 टक्के पाणीसाठा, मध्य वैतरणा, भातसा धरणाचे दरवाजे खुले

9. अल कायदाचा म्होरक्या आणि ओसामा बिन लादेनचा मुलगा ठार, हमजा बिन लादेनचा खात्मा केल्याचा अमेरिकेन मीडियाचा दावा

10. करण जोहरच्या घरातील पार्टीच्या व्हिडीओवरुन राजकीय वाद शिगेला, रेव्ह पार्टीच्या संशयावरुन नेटीझन्सचे सवाल, मिलिंद देवरांकडून करणचा बचाव