Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 19 जून 2021 | शनिवार | ABP Majha



  1. भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांचे निधन ; वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


 



  1. निवडणुकीला वेळ असून आता स्वबळाचा विषयच नाही, नाना पटोलेंच्या 'एकला चलो' भूमिकेला काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्याकडून पूर्णविराम


 



  1. पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! नियम आणि अटींसह महाबळेश्वर, पाचगणी आजपासून सुरु होणार


 



  1. राज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्याही लसीकरणास सुरुवात ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती


 



  1. राज्यात चिंताजनक असलेल्या सहा जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट घटला; तर नागपूर आणि कल्याण डोंबिवलीत काल कोरोनामुळे एकही मृत्यू नाही


 



  1. राज्यात काल दिवसभरात 9 हजार 798 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 14 हजार 347 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज


 



  1. तिसऱ्य़ा लाटेचा धोका असल्याने मुंबई लोकल सुरु होण्याची शक्यता धूसर; पॉझिटिव्हिटी रेट घटला, नव्या नियमांबाबत आजच्या बैठकीत निर्णय


 



  1. राहुल गांधी यांच्या 51व्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचा आज संकल्प दिवस, 2024 मध्ये राहुल गांधींना पंतप्रधान पदी बसवण्याचा निर्धार


 



  1. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन संवाद साधणार, राम मंदिर जागेवरुन शिवसेना-भाजपत झालेल्या राड्यावर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष


 



  1. पालघरमधील केंद्र सरकारच्या वाढवण बंदर प्रकल्पाला तात्पुरता ब्रेक, सर्व्हेक्षणाला हरित लवादाकडून स्थगिती, मच्छिमांरांशी संवाद साधण्यासाठी समिती