1. आदित्य ठाकरेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, जनआशीर्वाद यात्रेदरम्यान संजय राऊतांचे संकेत, तर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय उद्धव-शाह घेतील, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

2. कर्नाटकच्या राजकीय नाट्याचा आज क्लायमॅक्स होण्याची शक्यता, दुपारी दीडपर्यंत बहुमत सिद्ध करण्याच्या राज्यपालांच्या सूचना, भाजप आमदारांचं रात्रभर विधानसभेत धरणे आंदोलन

3. कृत्रिम पावसाच्या प्रयोगापूर्वीच्या निरीक्षणासाठी सोलापुरात केंद्राची विमानं दाखल, तर राज्य सरकारकडूनही हालचालींना वेग, 30 जुलैपूर्वी प्रयोगाची शक्यता

4. नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदा बरखास्त, कार्यकाळ संपल्यानंतरही निणडणुका लांबवल्याने सर्वोच्च न्यायालयाची कारवाई

5. नऊ वर्षांनी पोलिस सेवेत परतलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा तडकाफडकी राजीनामा, राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा

6. ठाण्यातील उद्यानातून 'छोटा भीम'च्या सहकाऱ्याचं 'अपहरण', पाचपैकी एका पुतळा दहा महिन्यांपासून बेपत्ता महापालिकेचं दुर्लक्ष

7. टिकटॉक मोबाईल अॅपवर बंदी घालण्यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र, देशविरोधी भावना भडकवत असल्याची तक्रार

8. मराठी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेला तूर्तास जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार, मात्र साताऱ्यातील खंडणीचा खटला लवकर संपवण्याचे आदेश

9. आयसीसीच्या 'हॉल ऑफ फेम'मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला स्थान, मोठा सन्मान मिळाल्याची सचिनची प्रतिक्रिया

10. मानवाने चंद्रावर पाऊल ठेवल्याला 50 वर्षे पूर्ण, जगभरातल्या अनेक देशात जल्लोष साजरा होणार, गुगलचंही खास डूडल