1. राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ; काल 328 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद, राज्यातील आकडा 3648 वर

    2. देशातील 29 टक्के कोरोना बाधित दिल्लीतील निझामुद्दीन मर्कजशी संबंधित, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

    3. जगभरात कोरोना बाधितांची संख्या 23 लाख 31 हजारांवर तर मृतांचा आकडा एक लाख 60 हजारांवर

    4. देशांतर्गत विमान वाहतूक सुरु करण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय नाही, एअर इंडियाच्या वेबसाईटवरील माहितीनंतर भारत सरकारचं स्पष्टीकरण

    5. घरभाडं वसुली तीन महिन्यांसाठी पुढे ढकलावी, गृहनिर्माण विभागाची घरमालकांना सूचना; तर शालेय फी भरण्यासाठी सक्ती करु नका, शिक्षण विभागाची शाळांना विनंती

    6. सोमवारपासून टोल वसुली सुरु होणार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आदेश, खासगी आणि व्यावसायिक वाहनांकडून टोल वसुली सुरु करणार

    7. शेवटी 'त्या' चिमुकल्याला आईकडे पोहोचवलं, लॉकडाऊनमध्ये ताटातूट झालेल्या मायलेकराची एबीपी माझाच्या बातमीमुळे भेट

    8. मुंबईतील वांद्रेच्या बीकेसी भाजी मंडईत खरेदीसाठी गर्दी कायम, भाजी खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा

    9. मुंबईत अडकलेल्या कष्टकरी, कामगारांना बीएमसीकडून विनामूल्य जेवण, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची माहिती

    10. पालघरमध्ये तिघांची जमावाकडून हत्या, आतापर्यंत 101 आरोपींना पोलीस कोठडी; तर अल्पवयीन 9 जणांची बालसुधारगृहात रवानगी