स्मार्ट बुलेटिन | 19 एप्रिल 2019 | शुक्रवार | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 19 Apr 2019 10:25 AM (IST)
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
स्मार्ट बुलेटिन | 19 एप्रिल 2019 | शुक्रवार | एबीपी माझा दुसऱ्या टप्प्यात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात मतदानाचा टक्का घसरला, राज्यात सरासरी 62 टक्के मतदान प्रकाश आंबेडकरांपाठोपाठ सुशीलकुमार शिंदेंचाही ईव्हीएमवरुन आरोप, तर मतदानाचं फेसबुक लाईव्ह केल्यानं अनेकांवर गुन्हे जातीय हिंसाचारावर मौन बाळगणारे मोदी आता मतांसाठी जात काढताहेत, पुण्यात राज ठाकरेंचा घणाघात दानवे माझी महेबूबा, मी त्यांच्यावर प्रेम करतो, ते माझ्यावर इश्क करतात, अर्जुन खोतकरांच प्रतिपादन एकीकडे अनिल अंबानींवर राहुल गांधींचं टीकास्त्र, तर दुसरीकडे मुकेश अंबानींचा काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा चौकीदारीच्या विरोधाभासी विधानांचा आधार घेत मिलिंद देवरांकडून अरविंद सावंतांची गोची, मुंबईतील चर्चासत्रात दोघे आमनेसामने पंतप्रधान हा अखिलेश यादव, मायावती यांच्यासारखा असावा, काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हांचं वक्तव्य जेट एअरवेज संदर्भातील याचिका ऐकण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार, विधी लवादाकडे दाद मागण्याची सूचना पिंपरीमधील दरोड्याचा 40 दिवसांनी छडा, मित्राच्या हत्येचा बदला घेण्यासाठी उच्चशिक्षित तरुणाचं कृत्य मुंबई इंडियन्सकडून दिल्ली कॅपिटल्सचा 40 धावांनी धुव्वा, मुंबईची गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप