राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये


1. नाणारमध्येच रिफायनरी प्रकल्प सुरु करण्याची मुख्यमंत्र्यांची भाषा, आरेवरून शिवसेनेला इशारा, तर भूमिपुत्रांच्या विरोधामुळेच नाणारला विरोध, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य

2. चंद्रकांत पाटलांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे राजू शेट्टींचे संकेत, मतविभाजन टाळण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येणाचंही आवाहन

3. विधानसभेसाठी उमेदवारांची यादी तयार करा, कृष्णकुंजवरच्या बैठकीत राज ठाकरेंचे मनसे नेत्यांना आदेश, सूत्रांची माहिती

4. निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत निवडणूक आयोगाची बैठक, येत्या दोन दिवसात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता

5. भाजप आमदार संगीता ठोंबरेंविरोधात खोट्या स्वाक्षऱ्या करुन फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल, आर्थिक व्यवहाराशी संबंध नसल्याचं ठोंबरेंचं स्पष्टीकरण



6. राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांचा नाशिक जिल्हा परिषदेत रात्रभर ठिय्या, सिमेंट बंधारा कामाची फाईल गहाळ केल्याचा आरोप

7. राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होणार, हवामान खात्याचा अंदाज, लातूर, परभणीत मुसळधार, आज-उद्या मुंबईत अतिवृष्टीचा इशारा

8. पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारताच्या नियंत्रणाखाली, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचं मोठं वक्तव्य, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकलाही खडेबोल

9. सरन्यायधीशांच्या निवृत्तीपूर्वी 17 नोव्हेंबरआधी अयोध्या प्रकरण निकाली काढण्याचे सुप्रीम कोर्टाचे संकेत, वकिलांना महत्त्वाच्या सूचना

10. भारतीय क्रिकेटवर पुन्हा मॅच फिक्सिंगचे सावट, मॅच फिक्सिंगसाठी दोघांनी संपर्क साधल्याची महिला क्रिकेटपटूची तक्रार