देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. शासकीय कर्मचाऱ्यांना ठाकरे सरकारचा दिलासा, कर्मचारी आणि कुटुंबातील कोरोनावरील उपचाराचा खर्च सरकार देणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती


2. केंद्रानं परवानगी दिल्यास जानेवारीपासून राज्यात लसीकरणाला सुरुवात, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती; लसीकरणासाठी नागरिकांना मोबाईलवर मेसेज येणार


3. मेट्रो कारशेडसाठी वांद्रे कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित जागेचा विचार, कांजूरमार्गच्या जागेबाबत कोर्टाच्या स्थगितीनंतर ठाकरे सरकारच्या हालचाली


4. बॉलिवूड निर्माता करण जोहरशी संबंधित काही लोकांना एनसीबीचं समन्स, करण जोहरच्याही चौकशीची शक्यता; अर्जुन रामपालच्या मेव्हण्याचं बॉलिवूडमध्ये ड्रग्जचं जाळं, एनसीबीच्या सूत्रांची माहिती


5. 28 हजार कोटींच्या शस्त्र खरेदीला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी, भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; स्थानिक कंपन्यांकडूनच होणार खरेदी


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 18 डिसेंबर 2020 | शुक्रवार | ABP Majha



6. कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचं शेतकऱ्यांना आठ पानांचं पत्र, तर दिल्ली विधानसभेत नव्या कृषी कायद्याची प्रत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी फाडली


7. देशातील वाहनांच्या मुक्तसंचारासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचा मोठा निर्णय, पुढील दोन वर्षांत जीपीएस प्रणालीद्वारे बँक खात्यातूनच टोल वसूल करण्याची तयारी


8. नागपुरातील अपहरण केलेल्या मुलीचा अखेर शोध लागला, एबीपी माझाच्या बातमीनंतर नागपूर पोलिसांनी जाग, अवघ्या 5 तासांत कारवाई


9. शहापूरजवळ भीषण अपघात, विशेष सरकारी वकील अजय मिसर थोडक्यात बचावले, बस चालकाचा ताबा सुटल्याने अपघात, काही प्रवासी जखमी


10. जगभरात सलग दुसऱ्या दिवशी 7 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद, गेल्या 24 तासांत 12 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू, तर आतापर्यंत 16.67 लाख लोकांचा मृत्यू