स्मार्ट बुलेटिन | 17 मे 2019 | शुक्रवार | एबीपी माझा

  1. महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसे देशभक्त, चौफेर टीकेनंतर आढेवेढे घेत प्रज्ञा साध्वीचा माफीनामा, निवडणूक आयोगानं रिपोर्ट मागवला


 

  1. पंतप्रधान मोदींना तुरुंगात खेचेन, ईश्वरचंद्र यांची मूर्ती तोडल्याच्या आरोपावरुन प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आक्रमक तर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी मुकूल रॉय यांची गाडी फोडल्याचा आरोप


 

  1. घराचा ताबा मुदतीच्या वर्षभरानंतर मिळाला नाही तर ग्राहकांना संरक्षण, पैसे परत मागण्याचा अधिकार, राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा बिल्डरांना चाप


 

  1. मराठा विद्यार्थ्यांच्या मेडिकल प्रवेशाचा तिढा सोडण्यासाठी आज अध्यादेश काढणार, निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतर सरकारचा जीव भांड्यात


 

  1. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसे आक्रमक, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा, आंब्याच्या स्टॉलवरुन राजकारण शिगेला




  1. बलात्काराच्या खटल्यांमध्ये केवळ पीडित महिलेची जबानीच अंतिम पुरावा ठरु शकत नाही, मुंबई उच्च न्यायालयाचं निरीक्षण


 

  1. एकाच आठवड्यात सोन्याचा भाव हजारानं वाढला, एका तोळ्यामागचा दर 32 वरुन 33 हजार रुपयांवर, अक्षयतृतीयेनंतर झळाळी कायम


 

  1. अभिनेत्री तनुश्री दत्ताचा लैंगिक छळ प्रकरणी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना दिलासा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्यामुळे नाना पाटेकरांना क्लीन चिट


 

  1. बीएमडब्यू एक्स5 च्या नव्या मॉडेलचं सचिन तेंडुलकरच्या हस्ते अनावण, कारची किंमत 73 ते 83 लाखाच्या घरात, तर चालकाशी बोलणारी एमजी हेक्टरही लाँच


 

  1. साताऱ्याची गिर्यारोहक प्रियांका मोहितेने सर केला मकालू शिखर, 'मकालू'वर पाय रोवणारी प्रियांका पहिली भारतीय महिला