देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

  1. भारत-चीन सीमेवर झालेल्या झटापटीत 20 भारतीय जवान शहीद, तर भारतच्या प्रत्युत्तरात चीनचे जवान ठार झाल्याची माहिती;  महिनाभरापासून धुमसत्या वादाचा स्फोट

  2. भारत-चीन सीमेवरील तणावानंतर उच्चरस्तरीय बैठक, पंतप्रधान मोदींची अमित शाह, राजनाथ सिंह, निर्मला सितारमण आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत खलबत

  3. जे घडलं ते टाळता येऊ शकलं असतं, भारत-चीन सीमेवरील तणावानंतर भारतीय  परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

  4. काँग्रेस नेते सगल तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या प्रतिक्षेत; बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांना आज तरी भेट मिळणार का यावर प्रश्नचिन्ह

  5. बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत तर दहावीचा निकाल जुलैअखेरपर्यंत लागणार;  शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची एबीपी माझाला माहिती

  6. राज्यात काल दिवसभरात 1802 रुग्ण कोरोनामुक्त, मृतांचा आकडा पाच हजार पार; राज्यात बरे होण्याचा वेग  वाढला

  7. एसटीच्या मासिक/त्रैमासिक पासला मुदतवाढ, मुदतवाढ नको असल्यास प्रवाशांना परतावा मिळणार; एसटी प्रशासनाचा निर्णय

  8. कोरोनाच्या काळात पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर #WeWillHelp मोहिमेची चर्चा, बार्शीच्या 'सचिन'कडून सकारात्मकतेसह मदतीचा हात

  9. पालघरमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह आता आरोपीही कोरोनाच्या विळख्यात; गडचिंचले साधू हत्याकांडातील 11 आरोपींना कोरोनाची लागण

  10. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येबाबत पोलीस चौकशी सुरू, बॉलिवूडमधील दिग्गजांची चौकशी होण्याची शक्यता