स्मार्ट बुलेटिन | 17 एप्रिल 2019 | बुधवार | एबीपी माझा

  1. महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अकलूजमध्ये, तर सांगलीत अमित शाहांची सभा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे साताऱ्यात


 

  1. एका आठवड्यात साडेआठ लाख शौचालयं कशी बांधली, इचलकरंजीमधल्या सभेत राज ठाकरेंकडून स्वच्छ भारत योजनेवर सवाल


 

  1. काँग्रेसची 'न्याय' योजना फसवी, माझाच्या 'तोंडी परीक्षा' राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य


 

  1. 2019 च्या लोकसभेनंतर राजकीय संन्यास घेणार, काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्रीपद सुशीलकुमार शिंदेंची मोठी घोषणा


 

  1. पुण्यात तरुणावर अॅसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचा मृत्यू, प्रेमसंबंधातून सदाशिव पेठेत हल्ला, गोळी झाडून हल्लेखोराची आत्महत्या




  1. धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह गारपीट, हिंगोलीतही पावसाचा तडाखा, आंबा, केळींचं मोठं नुकसान


 

  1. वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रियंका गांधी उतरण्याची शक्यता, एबीपीला दिलेल्या मुलाखतीत रॉबर्ट वाड्रांकडून संकेत


 

  1. मद्रास हायकोर्टानं टिकटॉकवर लावलेली बंदी हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा तूर्तास नकार, गुगल, अॅपलला टिकटॉक हटवण्याचे केंद्र सरकारचे आदेश


 

  1. राम नवमीनिमित्त साईंच्या झोळीत कोट्यवधींचं दान, 12 ते 15 एप्रिल दरम्यान चार कोटी 16 लाखांची देणगी साईचरणी अर्पण


 

  1. किंग्स इलेव्हन पंजाबकडून राजस्थान रॉयल्सचा 12 धावांनी पराभव, विजयासह किंग्स इलेव्हन पंजाब गुणतालिकेत चौथं स्थानी