VIDEO | स्मार्ट बुलेटिन | 16 मार्च 2019 | शनिवार | एबीपी माझा

  1. भाजप आज लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर कऱणार, दिल्लीत संसदीय समितीची बैठक, काँग्रेसची दुसरी तर राष्ट्रवादीची तिसरी यादी येण्याची शक्यता


 

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगा शरद पवारांना भाजपत घेऊ नका, त्यांना तिथेच राहू द्या, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची नितीन गडकरींकडे मागणी


 

  1. सुजय विखेंना राष्ट्रवादीची ऑफर होती, गटबाजीच्या भीतीतून त्यांनी उमेदवारी नाकारली, इंदापूरमध्ये अजित पवारांचा गौप्यस्फोट


 

  1. हिंमत असेल तर निवडणूक लढवा, विश्वजीत कदमांचे प्रतीक पाटलांना आव्हान, लोकसभेच्या उमेदवारीवरुन सांगली युवा काँग्रेसमध्ये वाद,


 

  1. सांगलीची जागा स्वाभिमानी पक्षाला दिल्यास पक्ष कार्यालयाला टाळे ठोकू, काँग्रेस कार्यकर्त्यांचा पक्षश्रेष्ठींना इशारा




  1. निवडणुकांच्या तोंडावर पोलिस कारवायांना वेग, नागपूरच्या सावनेरमधून 80 लाखांची रोकड जप्त, तर नेत्रावती एक्स्प्रेसमधून 532 बाटल्या दारु हस्तगत


 

  1. सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई महापालिकेची पहिली कारवाई, दोन अधिकारी निलंबित, अन्य दोघांची चौकशी, तर आयुक्त अजॉय मेहतांचा पत्ता नाही


 

  1. डोंबिवलीच्या पादचारी पुलाची धोकादायक अवस्था, पूल अक्षरशः हलत असल्यानं नागरिकांमध्ये दहशत, तर ठाण्याच्या कोपरी पुलाच्या दुरुस्तीसाठी मनसे आक्रमक


 

  1. पादचाऱ्याला उडवून जाणाऱ्या गाडीला सातारा पोलिसांनी सोडलं, गाडी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची असल्याचं कळताच कारवाई नाही, दुर्घटनेत पादचाऱ्याचा मृत्यू


 

  1. मी तुझा बाप आहे, बुक्कीत दात पाडीन, पंढरपूरात पोलीस अधिकाऱ्याच्या अतिक्रमणविरोधी कारवाईवर आमदार भारत भालकेंचा रुद्रावतार