1. उदयनराजे भोसले यांच्याकडे छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे मागणारे जेम्स लेन आणि मुघलांची अवलाद, भाजपचा संजय राऊतांवर हल्लाबोल

2. संजय राऊतांनी माफी मागावी, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा, अन्यथा राऊतांविरोधात आंदोलन, उदयनराजे समर्थकांकडून आज सातारा बंदची हाक

3. जाणता राजा शब्द प्रचलित करणारे रामदास छत्रपतींचे गुरु नव्हते, साताऱ्यात शरद पवारांचं वक्तव्य, जाणता राजा विशेषणावरुन टीका करणाऱ्यांना उत्तर

4. काँग्रेस खासदर राहुल गांधी आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची दिल्लीत भेट, दोघांमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा, एनआरसी आणि महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत चर्चा

5. इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची 100 फुटांनी वाढणार, स्मारक दोन वर्षात पूर्ण करणारच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्धार



6. शिर्डी साईंच्या जन्मस्थानावरुन नव्या वादाची शक्यता, परभणीतल्या पाथरीला मुख्यमंत्र्यांकडून 100 कोटींचा निधी, पाथरीला मूळ जन्मस्थान दर्जा देण्यास शिर्डीकरांचा विरोध

7. पेट्रोलच्या किंमती 90 रुपये प्रति लीटरपर्यंत वाढण्याची शक्यता, इराण-अमेरिकेतील तणावाचा इंधनदरावर परिणाम, तर पुढील 5 वर्षांसाठी वीजदरवाढीचा महावितरणाचा प्रस्ताव

8. कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच 36 केंद्रीय मंत्री करणार जम्मू-काश्मीरचा दौरा, सर्व मंत्री कलम रद्द करण्यासंबंधी तसेच काश्मीरच्या विकासाबाबत जनजागृती करणार

9. नोटांवर लक्ष्मीचा फोटो लावल्यास रुपया मजबूत होईल, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींचा अजब सल्ला, इंडोनेशियाच्या नोटांवरील गणपतीच्या फोटोचा दाखला

10. अजय देवगणचा 'तान्हाजी' चित्रपट करमुक्त करण्यावर मंत्रीमंडळ बैठकीत एकमत, मुख्यमंत्र्यांकडून लवकरच घोषणा होण्याची शक्यता