स्मार्ट बुलेटिन | 15 ऑक्टोबर 2019 | मंगळवार | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 15 Oct 2019 08:12 AM (IST)
#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. निवडणुकीच्या तोंडावर नागपूरमध्ये मोठी कारवाई, तब्बल एक कोटींची रोकड जप्त, पाचपावलीतून 75 लाख तर सीताबर्डीतून 25 लाख हस्तगत 2. भाजपच्या संकल्पपत्राचं आज प्रकाशन तर नितेश राणेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कणकवलीत, तर भाजपचे दिग्गज नेतेही प्रचारात 3. उद्धव ठाकरे आज इस्लामपूर, कोल्हापूरमध्ये तर आदित्य ठाकरेंचे मुंबईत रोड शो, शरद पवारांचा सोलापूर, सांगली आणि पुण्यात दौरा 4. भाजपने पुणे, नाशकात शिवसेना शिल्लक ठेवली नाही, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला, तर पृथ्वीराज चव्हाणांमुळेच युतीची सत्ता आल्याची टीका 5. आम्ही सेक्युलर भारताला कधीच हिंदूराष्ट्र होऊ देणार नाही, कल्याणमधील सभेत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींचं वक्तव्य 6. बीडमध्ये लक्ष घालण्यापेक्षा बारामतीत लक्ष द्यावं, एखादी जागा वाढेल; परळीतील पत्रकार परिषदेत पंकजा मुंडेंचा शरद पवारांना टोला 7. अयोध्या प्रकरणातील सुनावणीचे शेवटचे तीन दिवस, मुस्लीम पक्षाच्या युक्तिवादाला हिंदू पक्ष उत्तर देणार, अयोध्येत कडेकोट बंदोबस्त 8. मुंबईसह राज्यातून मान्सून परतला, हवामान विभागाची माहिती, यंदा तब्बल 13 दिवस जास्त मुक्काम 9. 2019चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कर भारतीय वंशाच्या अभिजीत बॅनर्जी, इस्थर डफलो आणि मायकल क्रेमर यांना जाहीर, दारिद्र्य निर्मूलनासंदर्भात केलेल्या संशोधनासाठी गौरव 10. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची नियुक्ती निश्चित, तर अमित शाहांचे पुत्र जय शाह बीसीसीआयच्या सचिवपदी, राजीव शुक्लांची घोषणा