देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. सोमवारपासून सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळं सुरु, मास्क बंधनकारक, भाविकांमध्ये समाधान, तर सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याची भाजपची टीका


2. सरकारच्या निर्णयानंतर राज्यभरात भाविकांची जल्लोष, पुण्यात मिठाई वाटप, सोलापुरात सिद्धेश्वराची पूजा, तर पंढरपुरात फटाक्यांची आतषबाजी

3. ऑनलाईन पास असल्याशिवाय शिर्डीच्या साई मंदिरात प्रवेश नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थांचा निर्णय, तर पंढरपुरातही दीड ते दोन हजार भाविकांनाच दर्शन

4. देशासह राज्यभरात दिवाळीचा उत्साह, अमृतसरच्या सुवर्णमंदिराला आकर्षक रोषणाई, तर बिदरमध्ये दिव्यांपासून साकारली शिवरायांची प्रतिमा, विठ्ठल मंदिरही उजळलं

5. फटाके बंदीला मुंबईकरांचा प्रतिसाद, लक्ष्मीपुजनाच्या दिवशी मरिन ड्राईव्हवर शांतता, तर दिल्लीतील वायु प्रदूषणात मोठी वाढ

पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 15 नोव्हेंबर 2020 | रविवार | ABP Majha



6. एलओसीवर हल्ला करणाऱ्या पाकिस्तानला भारताचं चोख प्रत्युत्तर, पाकच्या बंकर्सच्या चिंधड्या, मिसाईल दिसताच पाकिस्तानी सैनिक बंकरमधून पळाला

7. लोंगेवालच्या भूमीवरून पंतप्रधान मोदींची गर्जना, आव्हान दिल्यास सडेतोड उत्तर मिळेल, मोदींचा चीन आणि पाकिस्तान इशारा

8. पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्रातील दोन सुपुत्रांना वीरमरण, कोल्हापूरचे ऋषिकेश जोंधळे, नागपूरचे भूषण सतई शहीद

9. राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी महाविकास आघाडीची राज्यपालांना मदतीची शिफारस, पंधरा दिवसांत सदस्या जाहीर करण्याची मागणी

10. ऊर्जाविभागाच्या भरतीत मराठा उमेदवारांना स्थान, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती, मराठा उमेदवारांचा खुल्या आणि एससीबीसी वर्गात समावेश