2. बारामतीला निघालो म्हणणारे अजित पवार मुंबईतच, हॉटेल ट्रायडंटमधल्या आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत सहभागी, एकसूत्री कार्यक्रमावर खलबतं
3. आघाडीसोबत योग्य दिशेने चर्चा, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, भाजपचा महाशिवआघाडी फोडण्याचा प्रयत्न, पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप
4. 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर सर्व शिवसेना आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश, रिट्रीट हॉटेलमधून आमदार आपापल्या मतदारसंघात परतणार
5. कोणी आमदार फोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचंच डोकं फुटेल, शिवसेना आमदार दिलीप लांडेंचं वक्तव्य, सेनेचा आमदार फोडणं शक्य नसल्याचाही दावा
6. राज्यातील 27 महापालिकांच्या महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर, मुंबई, ठाण्यासह आठ महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी, तर नवी मुंबई आणि औरंगाबादचं महापौरपद महिलांसाठी राखीव
7. केरळमधील शबरीमला मंदिरात महिला प्रवेशाविरोधातील फेरविचार याचिकांवर आज फैसला, तर राफेल प्रकरणाच्या याचिकेवरही निर्णय अपेक्षित
8. बालदिन आणि पंडित जवाहरलाल नेहरुंच्या 130व्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन, दिल्लीतील शांती वनमध्ये काँग्रेसचा विशेष कार्यक्रम
9. ब्राझीलमध्ये भारतीयांना व्हिसा फ्री एन्ट्री, ब्राझीलचे राष्ट्रपती बोलसोनारोंची घोषणा, सामाजिक सुरक्षेसंबंधी करार करत ब्रिक्स देशांनी एकत्र येण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन
10. भारत आणि बांगलादेश संघांमधल्या पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून इंदूरमध्ये सुरुवात, दीर्घ विश्रांतीनंतर कर्णधार विराट कोहली पुन्हा सज्ज