- पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाला आठवड्याभराची मुदतवाढ; मात्र MBBS, BDS बद्दल संभ्रम, तर ठोस आश्वासन मिळेपर्यंत विद्यार्थी आंदोलनावर ठाम
- मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात शाब्दिक लढाईला जोर, रडार आणि ढगांवरुन प्रियंका गांधींचा मोदींवर पटलवार तर कोलकात्यात आमित शाहांचा रोड शो
- लोकसभा निवडणुकीत उमेदवार न उतरवणाऱ्या मनसेची विधानसभेसाठी तयारी सुरु, रणनीती आखण्यासाठी ठाण्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा
- मला रोल देण्यासाठी वडिलांनी कधीच निर्मात्यांना गळ घातली नव्हती, विलासराव देशमुखांवरील केंद्रीय पियुष गोयल यांच्या टीकेला अभिनेता रितेशचं उत्तर
- आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांच्या पतीची तब्बल आठ तास ईडीकडून चौकशी, कर्ज घोटाळाप्रकरणी ईडीसमोर हजेरी
- पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही हेल्मेटसक्ती, हेल्मेट खरेदीसाठी नाशिककरांची दुकानात झुंबड, विनाहेल्मेट बाईक चालवणाऱ्या 1300 जणांवर कारवाई
- धावत्या लोकलसह प्रवासी फरपटत गेला, कुर्ला रेल्वे स्थाकातील थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे जीव बचावला
- कौमार्य प्राप्तीसाठी मुंबई-पुण्यातल्या तरुणींचा शस्त्रक्रियेकडे ओढा, वर्जिनिटी सिद्ध करण्यासाठी शस्त्रक्रिया करत असल्याचं धक्कादायक वास्तव उघड
- अमेरिकेतील अलास्कात दोन फ्लोटप्लेन्सची हवेत टक्कर, अपघातात वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू तर दहा जण जखमी, विमानातील एक जण बेपत्ता
- आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सचं जोरदार स्वागत, ढोलताशांच्या गजरात मुकेश अंबानींच्या अँटिलियापासून मरिन ड्राईव्हपर्यंत जंगी मिरवणूक