नागपूर : "सॉरी आई, सॉरी बाबा...मी स्वतःला सांभाळण्याचे खूप प्रयत्न केले...मात्र सांभाळू शकलो नाही. मी तिच्याच जवळ चाललोय," अशी सुसाईड नोट लिहून नागपूरच्या सम्यक मेश्राम या 19 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. सम्यकने 11 मे रोजी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. सम्यक हा बीकॉमच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता.
तरुणीच्या आत्महत्येमुळे सम्यक निराश
पोलिसांच्या माहितीनुसार, सम्यकचे काही महिन्यांपासून एका समवयस्क तरुणीसोबत मैत्रीपूर्ण संबंध होते. क्षुल्लक कारणावरुन काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये भांडण झालं. त्याच तणावात तरुणीने 5 एप्रिल रोजी तिच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यावेळी तरुणीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरुन सम्यकविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार नोंदवली होती. या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर सम्यक सातत्याने त्या तरुणीच्या आठवणीत निराश व्हायचा. अखेर 11 मे रोजी वडील कामावर आणि आई तसंच धाकटी बहीण घरी नसताना, सम्यकने बेडरुममध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं.
"...म्हणून तिच्याजवळ जात आहे"
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये सम्यकने त्याच्या आई-वडिलांची माफी मागितली. "मी स्वतःला सांभाळण्याचे खूप प्रयत्न केले मात्र, सांभाळू शकलो नाही. ती जेव्हा मृत्यूशी संघर्ष करत होती, अखेरचे श्वास घेत होती, तेव्हाही मी तिला साथ देऊ शकलो नाही, म्हणून मी तिच्या जवळ जात आहे," असं त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
या घटनेनंतर सम्यकच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. नागपुरातही या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
'सॉरी आई, सॉरी बाबा...मी तिच्याजवळ चाललोय,' सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 May 2019 08:19 AM (IST)
सम्यक मेश्राम आणि एका तरुणीची मैत्री होती. मात्र त्यांच्या झालेल्या भांडणानंतर तरुणीने आत्महत्या केली. परंतु सम्यक तिच्या आत्महत्येमुळे निराश झाला होता. याच निराशेतून त्यानेही आयुष्य संपवलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -