स्मार्ट बुलेटिन | 15 जून 2019 | शनिवार | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 15 Jun 2019 10:05 AM (IST)
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
मंत्रीमंडळ विस्ताराच्या आशा पल्लवीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, ट्वीटद्वारे माहिती शिवसेना युतीतच लढणार, युतीत वाद असल्याच्या शरद पवारांच्या विधानांकडे लक्ष देऊ नका, उद्धव ठाकरेंची शेलकी टीका छत्रपती असल्यासारखं वागा, सूर्याजी पिसाळासारखं वागू नका, रामराजे नाईक निंबाळकरांचा उदयनराजे भोसलेंवर निशाणा बिश्केक परिषदेदरम्यान नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्यात चर्चा, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दावा, भारताकडून अद्याप दुजोरा नाही ममता बॅनर्जींनी बिनशर्त माफी मागावी, निवासी डॉक्टरांची मागणी, महाराष्ट्रातील संप मागे, पश्चिम बंगालमध्ये मात्र डॉक्टर संपावर ठाम इनाम जमिनीच्या कथित बेकायदा खरेदी प्रकरणी धनंजय मुंडेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, गुन्हे दाखल करण्याच्या हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती मालाड,अंधेरी आणि गोवंडीत अंगावर झाड कोसळल्याने तिघांचा मृत्यू, तर ठाण्यात रस्ता खचून 3 गाड्यांचं नुकसान तिसऱ्या अपत्यासाठी 50 हजार तर चौथ्या आपत्यासाठी 1 लाखांची मदत, लोकसंख्या घटत असलेल्या माहेश्वरी समाजाचे चेतना लहर अभियान तिथीनुसार आज शिवराज्याभिषेक दिन सोहळा, राज्यभरात अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन, रायगडावर शिवभक्तांची आलोट गर्दी यंदाच्या साहित्य अकादमी पुरस्कारांमध्ये इंदापूरच्या सुशीलकुमार शिंदेंना युवा पुरस्कार तर सलीम मुल्लांना बाल साहित्य पुरस्कार जाहीर