2.पश्चिम बंगालमधले विरोधी पक्षाचे 107 आमदार भाजपच्या वाटेवर, मुकुल रॉय यांचा दावा, तर मध्य प्रदेश आणि राजस्थानही भाजपच्या निशाण्यावर, प्रकाश जावडेकरांचं सूचक वक्तव्य
3.सप्टेंबर महिन्यात पहिलं राफेल विमान हवाई दलाच्या ताफ्यात, दोन वर्षात 36 विमानं मिळणार, सुरक्षा उत्पादन विभागाच्या सचिवांची माहिती
4.ईशान्य भारत आणि बिहारमध्ये पावसाचा कहर, तब्बल 14 लाख नागरिकांना पुराचा फटका, आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू, लाखो हेक्टरवरील पीक नष्ट
5.भाजप नेत्याकडून धोनीच्या राजकीय प्रवेशाचे संकेत, झारखंडच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या संजय पासवान यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
6.महाराष्ट्रात शनिवारी दिवसभरात 7 हत्या, तिहेरी हत्याकांडानं साईबाबांची शिर्डी हादरली, नवी मुंबईतही तीन मजुरांचा घात, तर नागपुरात मॉडेलची निर्घृण हत्या
7.दानपेटी लिलाव प्रक्रिया बंद केल्यानंतर तुळजाभवानीचरणी 500 कोटींचं दान, मागील दहा वर्षात देवीच्या चरणी 161 किलो सोनं तर तीन हजार किलो चांदी अर्पण
8.चंद्राला गवसणी घालण्यासाठी भारत दुसऱ्यांदा सज्ज, मध्यरात्री इस्रोचं यान चंद्राच्या दिशेनं झेपावणार, पहाटे श्रीहरिकोटातून प्रक्षेपण
9.रोमानियाची सिमोना हालेप ठरली विम्बल्डन महिला एकेरीची नवी विजेती, सिमोनानं अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचा 6-2, 6-2 असा उडवला धुव्वा
10.आयसीसीच्या वन डे विश्वचषकाला यंदा मिळणार नवा विजेता, इंग्लंड आणि न्यूझीलंड संघांत आज लॉर्डसवर अंतिम सामना