Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 13 जून 2021 | रविवार | ABP Majha



  1. मुंबई, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत ऑरेंज अलर्ट; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन


 



  1. सलगच्या पावसामुळे नवी मुंबईतील धबधबे प्रवाहीत, कोरोनाचं संकट विसरुन पारसिक हिल परिसरात नागरिकांची गर्दी


 



  1. नालेसफाई कंत्राटदाराला अमानूष वागणूक देणारे शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे वादाच्या भोवऱ्यात ; कामचुकारपणाचा आरोप लावत कंत्राटदाराला नाल्याच्या कचऱ्यात बसवलं


 



  1. ब्लॅक फंगससह कोरोनासंबंधित औषधं, मेडिकल वस्तूंवर जीएसटी कपात; जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत महत्वाचे निर्णय


 



  1. जी-7 शिखर संमेलनात पंतप्रधान मोदींचा 'वन अर्थ वन हेल्थ'चा नारा, तर जर्मनीच्या चांसलर एंजेला मर्केल यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक


 



  1. सीरम इन्स्टिट्युटचे अदर पूनावाला, डब्ल्यूएचओसह अनेकांवर लखनौ कोर्टात फसवणुकीची तक्रार, कोविशील्डच्या डोसनंतर अँटीबॉडीज तयार न झाल्याचा तक्रारदाराचा आरोप


 



  1. राज्यात काल दिवसभरात 10 हजार 697 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 14 हजार 910 डिस्चार्ज


 



  1. माझी कुणासोबत तुलना करू नका, माझा लढा स्वतंत्र; खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं वक्तव्य


 



  1. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सत्तेत असूनही गुलामासारखी वागणूक मिळाली, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचं धक्कादायक वक्तव्य


 



  1. फ्रेंच ओपनच्या सेमीफायनलमध्ये जोकोविचने नदालला पराभूत करून रचला इतिहास; अंतिम सामन्यात त्सिटिपासशी होणार सामना