देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. राजस्थानमध्ये मध्यरात्री काँग्रेसची पत्रकार परिषद, गहलोत सरकार मजबूत असल्याचा दावा; तर उपमुख्यमंत्री सचिन पायलट भाजपच्या वाटेवर, सुत्रांची माहिती
2. महाराष्ट्रात काल 7 हजार 827 नवे कोरोना बाधित, राज्यातील कोरोना बाधितांची संख्या अडीच लाखांच्या पुढे; 24 तासांत 173 रुग्णांचा मृत्यू
3. कोरोनावरील लस तयार केल्याचा रशियातील सेशेनोव्ह विद्यापीठाचा दावा, सर्व चाचण्या यशस्वी झाल्याचं विद्यापीठातील तज्ज्ञांचं मत
4. पुण्यात आज मध्यरात्रीपासून 10 दिवसांचा लॉकडाऊन, पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र आयटी कंपन्या उद्योग-धंदे सुरुच राहणार
5. ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये 19 जुलै संध्याकाळपर्यंत लॉकडाऊन वाढवला, तर नवी मुंबईतही लॉकडाऊनमध्ये वाढ
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 13 जुलै 2020 | सोमवार | ABP Majha
6. आरोग्य सेतू अॅपवर मुलांनी दिली चुकीची उत्तरं तापदायक ठरली, कुठलीही लक्षणं किंवा आजार नसताना नाईलाजाने वर्ध्यातील संपूर्ण कुटुंब क्वॉरंटाईन
7. एसटी महामंडळातील 90 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना सक्तीची रजा, कामगारांमध्ये असंतोष; निर्णय रद्द करा, अशी कर्मचारी संघटना इंटकची मागणी
8. बच्चन कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण, अभिषेक आणि बिगबी यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार, तर ऐश्वर्या आणि आराध्या होम क्वॉरंटाईन
9. एसबीआय बँक कर्मचाऱ्याच्या मुलाने चक्क डुप्लिकेट स्टेट बँकच्या ब्रान्च उघडली, शाखा बघून अधिकारीही थक्क; तामिळनाडू पोलिसांकडून तिघांना बेड्या
10. पुण्यात लग्नाचा जल्लोष महागात; नवदाम्पत्यासह 35 वऱ्हाडी कोरोना पॉझिटिव्ह, तर सात गावं सील, जुन्नर तालुक्यातील हिवरे बुद्रुकमधील घटना