देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. हजारो शेतकऱ्यांचा आज 'चलो दिल्ली' मार्च; राजधानीतल्या आंदोलनाचा अठरावा दिवस, तर शेतकरी आंदोलन नक्षलवाद्यांच्या हातात, रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचा गंभीर आरोप


2. देशात कुटुंब नियोजनाची सक्ती करता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारचं प्रतिज्ञापत्र; कुटुंब किती मोठं असावं याचा निर्णय दाम्पत्याचा


3. शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांना आणखी एक धक्का, धाकटे पुत्र पुर्वेश सरनाईकांचीही ईडी चौकशी होणार, सोमवारी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश


4. महाराष्ट्रात आज आणि उद्या मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह, कोकणातही तुरळक पावसाचा अंदाज, मराठवाडा, विदर्भात गारपीटीचाही इशारा


5. 15 डिसेंबरपासून बारावी बोर्ड परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरता येणार, महाविद्यालयांमार्फतच अर्ज भरण्याचं शिक्षण मंडळाचं आवाहन


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 13 डिसेंबर 2020 | रविवार | ABP Majha



6. केक खाण्यासाठी परळीमध्ये कार्यकर्त्यांची झुंबड, पोलिसांना हटवावी लागली गर्दी, शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमातील प्रकार


7. मुंबई मेट्रो कडून मुंबईकरांना खुशखबर, प्रवाशांची संख्या वाढत असल्यामुळे मेट्रो प्रशासनाकडून सेवेची वेळ वाढवण्याचा निर्णय


8. बेळगावातील रायबागमध्ये फळं विक्री करणाऱ्या तरुणीवर अज्ञाताकडून अॅसिड हल्ला, हल्लेखोराचं आत्मसमर्पण, तरुणीवर उपचार सुरु


9. वॉशिंग्टन डीसीमध्ये गांधीजींच्या पुतळ्याची अवमानना, खलिस्तानी आंदोलकांची कृत्य, घटनास्थळी आढळले खलिस्तानी झेंडे


10. जगभरात आतापर्यंत 5 कोटी रुग्ण कोरोनामुक्त, गेल्या 24 तासांत 6.26 लाख नवे कोरोना बाधिच, तर 10 हजार रुग्णांचा मृत्यू