1. मुख्यमंत्र्याचं कार्टून फॉरवर्ड केल्याने शिवसैनिकांकडून नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला मारहाण, कांदिवलीतील दोन शाखाप्रमुखांसह चौघांना अटक
2. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हा सर्वंकष अधिकार समजू नये, मुख्यमंत्री अन् आदित्य ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या महिलेला अटकेपासून दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
3. मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढता येईल का, मराठा उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची चर्चा, सरकार फेरविचार याचिका दाखल करणार, अशोक चव्हाण यांची माहिती
4. पुण्यातील कोरोना आटोक्यात आणा, अन्यथा पुढच्या बैठकीत अधिकारी दिसणार नाही, अजित पवार यांचा सज्जड दम, पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा
5. राज्यात कोरोनाबाधितांचा उच्चांक, काल दिवसभरत 24 हजार 886 नवे रुग्ण, तर एकूण कोरोना रुग्णांची संख्या दहा लाखांच्या वर
6. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने आजपासून कोल्हापुरात जनता कर्फ्यू, व्यापाऱ्यांचा मात्र विरोध, इंदापूर तालुक्यातही आजपासून 20 सप्टेंबरपर्यंत कर्फ्यू
7. लक्षणे नसलेल्या पर्यटकांनाच प्रवेश, सामानाची स्वत:च ने-आण, राज्यात कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागातील हॉटेल्स, रिसॉर्टस्, होम-स्टेबाबत नियमावली जाहीर
8. काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल, मल्लिकार्जुन खरगेंऐवजी एच के पाटील हे महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रभारी, सोनिया गांधींच्या मार्गदर्शनाखाली पाच सदस्यीय नेत्यांची टीम
9. सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचं दीर्घ आजाराने निधन, वयाच्या 80 व्या वर्षी दिल्लीतील रुग्णालयात अखेरचा श्वास
10. ठाण्यातील वाघबीळ ब्रीजवरील अपघात थांबवण्यासाठी प्रयत्न करा, फेसबुक लाईव्हद्वारे मराठी अभिनेता कुशल बद्रिकेचं अधिकाऱ्यांना आवाहन