देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
  1. नितीश कुमार यांच्या नेतृत्वात आम्ही बिहारचा विकास करु, कार्यकर्त्यांना संबोधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं वक्तव्य
 
  1. अन्वय नाईक आत्म1हत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामिनावर सुटका
 
  1. राज्यातील शिक्षकांना लोकल प्रवास उपलब्ध करावा, 6 नोव्हेंबरलाच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं रेल्वे बोर्डाला पत्र; राज्य सरकार आणि रेल्वेत पुन्हा वादाची चिन्ह
 
  1. दिवाळीच्या खरेदीसाठी दादरमध्ये गर्दी, कोल्हापूरच्या महाद्वार रोडवरही नागरिकांची झुंबड; ना तोंडांला मास्क, ना सोशल डिस्टन्सिंगचं पालन
 
  1. रायगडमधील रोहा येथील सुदर्शन कंपनीला लागलेली आग आटोक्यात, आगीत कोणतीही जीवीतहानी नाही, रात्री सव्वा अकराच्या सुमारास लागली होती आग
 
  1. ठाण्यातील घोडबंदर रोड लवकरच ट्रॅफिक मुक्त होणार, संजय गांधी उद्यानाच्या हद्दीतील सर्विस रोडची जागा वनविभाग बांधकामासाठी ठाणे महानगरपालिकेला देणार
 
  1. आजोबा-वडिलांचा 'कार'नामा; चिमुकलीचा हट्ट पुरवण्यासाठी 4 महिन्यांत मेड इन इंडिया विंटेज कारची निर्मिती
 
  1. युरोपियन युनियनकडून कोविड -19 लशीच्या वितरणास हिरवा कंदिल, वितरण निष्पक्षपणे करण्याचे डब्लूएचओचे आवाहन
 
  1. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी युएईवरून ऑस्ट्रेलियाला रवाना; कोरोना काळातील भारतीय संघाचा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा
 
  1. आयपीएल 2021 मध्ये 8 ऐवजी 9 संघ खेळण्याची शक्यता; बीसीसीआयचा याबाबत विचार सरु