गोंदिया : 10 वर्षापासून फरार असलेल्या जहाल नक्षलवाद्याला गोंदिया पोलिसांनी मोठ्या शिताफीतीने छत्तीसगढ राज्यातून अटक केली आहे. या जहाल नक्षलवाद्याचे नाव रमेश मडावी असे आहे. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाचे 12 लाख रुपयाचे पुरस्कार देखील होते.


रमेश मडावी याने 1997-98 मध्ये नक्षल दलममध्ये सहभाग घेत गोंदिया जिल्यात अनेक मोठ्या नक्षल घटना घडवून आणल्या होत्या. देवरी नक्षल दलम मध्ये त्याची वर्णी एसी एम एल ओ एस कमांडर म्हणून देखील लागली होती . तर देवरी दलममध्ये असताना रमेशने पोलिस स्टेशन चिचगड अंतर्गत येणाऱ्या मगरडोह हद्दीमध्ये पोलिस पथकावर प्राण घातक हल्ला देखील केला होता. तसेच या परिसरात हत्या ,गावकऱ्यांवर हल्ले चढविणे ,सार्वजनिक मालमतेची नासधूस करणे अशा विविध घटनांमध्ये रमेश मडावी याचा सहभाग होता. त्याच्यावर या आधी देखील 13 गुन्हे दाखल आहेत. तर रमेश मडावी हा छत्तीसगढ राज्यातील सुकमा जिल्यात वावरत असल्याची गुप्त माहिती गोंदिया पोलिसांना मिळताच. पोलिसांनी छतीसगढ राज्यातील पोलिसांच्या सहकाऱ्याने सुकमा जिल्ह्यात जाऊन रमेश मडावीला अटक केल्यामुळे पोलिसांना मोठे यश आले आहे.