- वायू चक्रीवादळामुळे मान्सून आठवडाभर लांबणीवर, महाराष्ट्राची चिंता वाढवणारी हवामान विभागाची माहिती, तर भारतातला पाऊस पाकिस्तानात सरकण्याची शक्यता
- मुंबईतल्या जहांगीर कला दालनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आमने-सामने, दोघांनीही एकमेकांशी बोलणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
- 14 जूनला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, सूत्रांची माहिती, विखे, सत्तार आणि मोहिते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, शेलार आणि क्षीरसागरांच्या वर्णीचीही शक्यता
- फक्त लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर अकरावीला प्रवेश द्या, एबीपी माझाच्या बातमीनंतर राज्य सरकारचा केंद्राकडे प्रस्ताव, निर्णयाकडे लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष
- जमीन खरेदीप्रकरणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करा, हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश, देवस्थानच्या जमिनीची अवैध खरेदी केल्याचा आरोप
- दादरमधील चैत्यभूमीवर भीमज्योत उभारण्यास राज्य सरकारची मान्यता, 15 दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन होणार
- महाराष्ट्राच्या 'ताज महाल'ची पडझड, औरंगाबादमधील बिबी का मकबरा काळवंडला, पुरतत्व विभागाचं दुर्लक्ष
- ठाण्यात 'पेपर बॉम्ब' ड्रग्जचा विळखा, पाच किलो चरस आणि एलएसडी मिळून 15 लाखांचे अंमली पदार्थ जप्त
- जेट एअरवेजचे मुंबईहून दिल्लीला जाणारे विमान हायजॅक केल्याची अफवा पसरवणाऱ्या उद्योगपतीला जन्मठेप, एनआयएच्या विशेष कोर्टाची कठोर पावलं
- सलामीवीर शिखर धवनच्या दुखापतीवर भारतीय संघव्यवस्थापनाचे वेट अँड वॉच धोरण, धवन दोन आठवड्यात तंदुरुस्त होण्याचा फिजिओंना विश्वास