देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधील कोविशील्ड लसीचं वितरण सुरु, कडेकोट सुरक्षेत लस घेऊन तीन वाहनं पहाटे एअरपोर्टला रवाना
2. कोरोना लसीकरणाबाबत अफवा पसरु नये यासाठी राज्य सरकारांनी काळजी घ्यावी, पंतप्रधान मोदींच्या सर्व मुख्यमंत्र्यांना सूचना
3. परभणीनंतर मुंबई, ठाण्यासह नऊ जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव, प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचं विशेष पथक, देशभरात दहा राज्यात फैलाव
4. अपघातात जखमी झालेल्या केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची प्रकृती स्थिर, पत्नी आणि स्वीय सहाय्यकाचा मृत्यू, कर्नाटकातील अंकोलाजवळ दुर्घटना
5. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींसह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार, अशोक चव्हाण यांची माहिती
6. एमपीएससीकडून विविध पदांच्या परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर, अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 27 मार्चला
7. दहावी बोर्ड परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना मुदतवाढ, तांत्रिक अडचणी आल्यानंतर बोर्डाचा निर्णय, विद्यार्थ्यांना दिलासा
8. कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनावरील सुनावणीआधी केंद्राचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र, तर ट्रॅक्टर रॅलीबाबत दिल्ली पोलिसांचाही अर्ज
9. हिंगणघाटच्या प्राध्यापिका जळीत कांडप्रकरणाच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात, तीन जणांची साक्ष नोंद, आज आणि उद्या इतरांची साक्ष होणार
10. भारतीय क्रिकेट संघाला दुखापतींचं ग्रहण, जाडेजापाठोपाठ हनुमा विहारी चौथ्या कसोटीतून बाहेर, इंग्लंडविरुद्ध खेळण्याबाबतही शंका