1. महाराष्ट्रातला लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवला, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, काही भागात लॉकडाऊन अधिक कडक करण्याचेही संकेत


 

  1. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 187 नवे रुग्ण तर 17 जणांचा मृत्यू ; राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1761वर


 

  1. देशात कोरोनाबाधितांची संख्या साडेसात हजार पार, तर औरंगाबादमध्ये सारीच्या आजाराने आतापर्यंत 13 जणांचा बळी


 

  1. कोरोना संकटाशी लढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आखली रणनीती; परिस्थिती वेगाने बदलत असल्याने सर्व राज्यांना सावध राहण्याच्या सूचना


 

  1. फसव्या जाहिरातींना बळी पडू नका; कुणालाही ऑनलाईन मद्य विक्रीची परवानगी नाही, सरकारचं आवाहन; तर सोशल मीडिया वापरणाऱ्यांसाठी सरकारकडून मार्गदर्शिका; नियम तोडल्यास कारवाई


 

  1. शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैशांचा तुटवडा, राज्य सरकारला कर्ज काढावं लागण्याची शक्यता, राज्याला 40 हजार कोटींचा महसुली तोटा


 

  1. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी तैनात असणाऱ्या मुंबईच्या ताज हॉटेलमधील 22 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; पुढील उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल


 

  1. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट उद्यापासून संपूर्णपणे बंद राहणार, गर्दी वाढल्याने दाणामार्केटसह, मसालामार्केट बंद होणार

  2. आपली परंपरा ओढून घेण्याची नाही तर वाटून खाण्याची आहे, कोरोनाच्या संकटात एक भाकरी आपण सगळे मिळून खाऊ; माझा कट्ट्यावर सामजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं मत

  3. कोरोना विरोधातली लस सप्टेंबरपर्यंत तयार होण्याची शक्यता, ब्रिटनच्या शास्त्रज्ञ सारा गिल्बर्ट यांची माहितीच; पुढील दोन दिवसांत माणसांवर प्रयोग होणार