देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. पहाटेपासून पालघरमध्ये भूकंपाचे 7 ते 8 धक्के, सर्वाधिक 4.2 रिश्टर स्केलच्या धक्क्याची नोंद, रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण


2. केंद्रीय पथक पुराचा फटका बसलेल्या विदर्भाच्या दौऱ्यावर; भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीत झालेल्या नुकसानाची पाहणी करणार

3. चालू शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार नसल्याचं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या प्रतिमध्ये नमूद, आज मुख्यमंत्री मराठा संघटनांशी संवाद साधणार

4. लोकल सेवा अजून किती दिवस बंद ठेवणार? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल, तर वकिलांना लोकलमध्ये प्रवेश देता येईल का? महाधिवक्त्यांकडे विचारणा

5. राज्यात काल सर्वाधिक 448 कोरोना बाधितांचा मृत्यू, तर 23 हजार 446 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, तर सीरमच्या कोरोना लसींच्या मानवी चाचण्यांना भारतातही ब्रेक

पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 11 सप्टेंबर 2020 | शुक्रवार | ABP Majha



6. कंगना रनौतच्या कार्यालयातील तोडकाम प्रकरणी 22 तारखेला सुनावणी, कार्यालयाची कंगनाकडून पाहणी, आठवलेंकडून कंगनाची भेट, तर शरद पवारांचा कंगनाला टोला

7. अनिल परबांना वर्षभरापूर्वी नोटीस बजावूनही कारवाई का नाही, भाजपच्या भातखळकरांचा सवाल; कंगना रनौतच्या कार्यालयाच्या तोडफोडीनंतर भाजपचा सेनेवर निशाणा

8. जळगावातल्या रावेरमध्ये वृद्ध दाम्पत्याची हत्या, जवळचा नातेवाईक पोलिसांच्या ताब्यात, हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट

9. सांगलीत आजपासून 10 दिवसांचा जनता कर्फ्यू, मनपा क्षेत्रातील व्यापाऱ्यांचा विरोध कायम; मात्र आठवडी बाजारासह रस्त्यावरील फळे, भाजीपाला विक्री पूर्णपणे बंद

10. मॉस्कोत भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये दोन तास चर्चा, बैठकीत पाच सूत्री शांतता फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब, मात्र सीमेवर चीनचा युद्धाभ्यास सुरुच