देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

  1. राज्यात कोरोना रुग्णांचा नवी उच्चांकं, दिवसभरात तब्बल 7 हजार 862 नवे कोरोना बाधित; तर 5 हजार 366 बरे होऊन घरी परतले

  2. पुणे आणि पिपंरी चिंचवडमध्ये पुन्हा निर्बंध, सोमवारी मध्यरात्रीपासून 23 जुलैपर्यंत लॉकडाऊन; तर संचारबंदीला पुणे व्यापारी महासंघाचा विरोध

  3. ठाणे, कल्याण-डोंबिवलीतही 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्णय; तर औरंगाबाद आणि मिरा भाईंदरमध्ये 18 जुलैपर्यंत लॉकडाऊन

  4. बोरिवलीत इंद्रपस्त मॉलच्या बेसमेंटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी; आग विझवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु

  5. ठाकरे सरकारमध्ये कोणताच विसंवाद नाही, सामनाच्या मुलाखतीत शरद पवार यांचं स्पष्टीकरण; कोरोना आणि आर्थिक संकटावरही पवारांची सडेतोड उत्तरं

  6. गणपतीला कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा क्वॉरंटाईन कालावधी चौदावरून सात दिवस करा;  पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रशासनाला निर्देश

  7. कोरोनामुळे अडचणीत आलेल्या सुतार, कुंभार, लोहार या समाजाला राज्य सरकारने अनुदान द्यावं, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

  8. राज्य सरकारच्या मदतीने खाजगी हॉस्पिटल कोविड रुग्णांची लूट करतायेत; भाजप नेते किरीट सोमैया यांचा आरोप

  9. कोरोना रुग्णांची नावे जाहीर करण्यासाठी हायकोर्टात याचिका, राज्य आणि केंद्र सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश

  10. अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'चा टायटल ट्रॅक रिलीज; चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव