1. गृह आणि नगरविकास खातं शिवसेनेकडे, तर अर्थ आणि गृहनिर्माण खातं राष्ट्रवादीकडे, सूत्रांची माहिती, अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता


2. तब्बल 5 वर्षांनंतर खडसे आणि ठाकरेंमध्ये समोरासमोर बसून चर्चा, मुंडेंच्या स्मारकाबाबत फडणवीसांनी निराशा केल्याचा सूर, भाजपकडून खडसेंची मनधरणी सुरु

3. नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयकाची आज राज्यसभेत परीक्षा, शिवसेना, जेडीयूच्या भूमिकेकडे लक्ष, लोकसभेत शिवसेनेने पाठिंबा दिल्याने काँग्रेसची नाराजी

4. उद्धव ठाकरेंचा शपथविधी सोहळा सर्व नियमांची पूर्तता करुनच, बीएमसी प्रशासनाचा हायकोर्टात युक्तिवाद, याचिकाकर्त्यांना भूमिका मांडण्याचे खंडपीठाचे निर्देश

5. नवी मुंबईत कांद्याचे दर 60 रुपयांपर्यंत घसरले, दर 40 टक्क्यांनी घसरले, आवक वाढल्याने भाज्याही स्वस्त, मात्र दुकानदारांकडून डाळींची कृत्रिम दरवाढ

6. आता दुचाकीवर बसणाऱ्या चार वर्षांवरील चिमुरड्यांनाही हेल्मेटसक्ती, सुरक्षेच्या कारणास्तव नवा वाहतूक नियम, पालकांना हेल्मेट खरेदीचं आवाहन

7. मुंबईत काशिमिरा पोलिसांकडून बारबालांची रोड परेड; आमदार गीता जैन यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांकडून निषेध, पोलिसांची विभागीय चौकशी होणार

8. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज संघात निर्णायक टी20 सामना, क्रिकेटच्या पंढरीत मालिका विजयाचे विराट सेनेचं लक्ष्य

9. 'छपाक'चा ट्रेलर पाहताना अभिनेत्री दीपिका पादूकोणला अश्रू अनावर, अॅसिड हल्ल्याची बळी ठरलेल्या लक्ष्मीची कहाणी सांगणारा 'छपाक' पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला

10. देशभर आज दत्त जयंतीचा उत्साह, नृसिंहवाडीसह शिर्डी शेगावमध्ये भाविकांची मोठी गर्दी, नेवासातील देवगडला आकर्षक विद्युत रोषणाई