2. दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटल्यानंतर एकनाथ खडसेंची शरद पवारांसोबत खलबतं, खडसे आज उद्धव ठाकरेंना भेटणार , शिवसेना प्रवेशाच्या चर्चेला उधाण
3. भाजप कोअर कमिटीची मुंबईत आज बैठक, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी चर्चा तर पंकजा मुंडेंच्या उपस्थितीबद्दल उत्सुकता
4. तेरा दिवसानंतरही ठाकरे सरकारच्या खातेवाटपाचं भिजत घोंगडं, आज खातेवाटप होण्याची काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांना आशा
5. शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारावरुन दोन मतप्रवाह, नामविस्तार नको अशी विचारवंतांची भूमिका, तर एकमतानेच विस्ताराबाबत ठरवा, संभाजीराजेंची खंत
6. राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करा आणि नवीन रस्त्यांच्या कामाला गती देताना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सुचना
7. वाशिम जिल्ह्यातील शिरपूर गावात आगळीवेगळी चोरी, पावसाळ्यात लागवड केलेल्या वृक्षांची चोरी सीसीटीव्हीत कैद
8. नव्या वर्षापासून विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदी, मंदिर समितीचा निर्णय, वारकऱ्यांमध्ये मात्र नाराजी
9.पॉर्नमुळेच तरुणांमध्ये विकृती वाढत असल्याची चर्चा, सर्वाधिक पॉर्न पाहणाऱ्या देशात भारताचा तिसरा नंबर, महाराष्ट्रात दोन दिवसांत पाच बलात्काराच्या घटना
10. मुंबईत एका झाड लावण्यासाठी किमान 59 हजार रुपयांचा खर्च, 33 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प महापालिकेला डोईजड