नवी दिल्ली : महाराष्ट्राने डर को खतम किया... महाराष्ट्राने सगळ्यांच्या मनात असलेली भिती संपवली. यामुळे महाराष्ट्रात परिवर्तन झाल आणि त्यामुळे महाराष्ट्राला वेगळी दिशा मिळाली असे मत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्रातील थरारक सत्ता संघर्षाचा अनुभव शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी, दिल्लीत अधिवेशनासाठी जमलेल्या महाराष्ट्रातील खासदारांच्या स्नेह भोजनावेळी सांगितला. राज्यात कोणाचे सरकार येणार काय होणार याबद्दल कोणालाच विश्वास नव्हता. 'मी सकाळी उठल्यापासून मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार असं म्हणायचो. एवढचं काय तर स्वप्नातदेखील मी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असं बडबडायचो', अस देखील ते यावेळी म्हणाले.


शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांचे एकत्र स्नेह भोजन 4 डिसेंबर रोजी आयोजीत करण्यात आलं होत. या स्नेह भोजनावेळी खासदार श्रीनिवास पाटील आणि अरविंद सावंत यांचा सत्कारही करण्यात आला होता. या स्नेह भोजनावेळी सर्व खासदारांच्या आग्रहाखातर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पडद्यामागील सत्तासंघर्षाचा थरारक अनुभव सांगितला. तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील विश्वासाचा धागा अतूट आणि मजबूत ठेवण्याची कामगिरी संजय राऊत यांनी कशी पार पाडली. याचा वृत्तांत स्वत: संजय राऊत यांनीच खासदारांसमोर जाहीर केला.

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राने देशाला दिशा दिली. आता देशातील इतर राज्यातले नेते ही म्हणत आहेत की 'ये हमारे यहा भी हो सकता है'. हा 36 दिवसांचा जो राजकीय खेळ होता, तो कमिटमेंटचा खेळ होता. शरद पवारांवर माझा कमालीचा विश्वास होता. शरद पवारांनी एकदा गोष्ट मनावर घेतली तर ते ती पूर्ण करतात यावर आमचा विश्वास होता. शरद पवारांनी साताऱ्याच्या राजाला घरी बसवण्याची कमिटमेंट देखील पाळली.

Sanjay Raut | “मी झोपेतही बडबडायचो मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार” - संजय राऊत | नवी दिल्ली | ABP Majha



राज्यातील सत्ता संघर्षाचा अनुभव सांगताना ते म्हणाले, एखाद्या थ्रिलर सिनेमासारखा हा अनुभव होता. राज्यात कोणाचे सरकार येणार काय होणार याबद्दल कोणालाच विश्वास नव्हता. मी सकाळी उठल्यापासून मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार अस म्हणायचो. एवढचं काय तर स्वप्नातदेखील मी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार अस बडबडायचो. शरद पवारांकडे जायला निघालो तर लोकांना वाटायच की, एक तर टोपी लागेल किंवा टोपी लावतील,

अजित पवारांच्या शपथविधीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, सकाळी मला जेव्हा फोनवर कळाले अजित पवारांनी शपथ घेतली. तेव्हा मला वाटल तो जुन्या शपथविधीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण त्यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस आहे हे कळाल्यानंतर मला खात्री पटली. परंतु अजित पवार संध्याकाळपर्यंत राजीनामा देतील यावर आमचा विश्वास होता.