Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 10 एप्रिल 2021 | शनिवार | ABP Majha


1. राज्यातील तीन आठवड्यांसाठी संपूर्ण लॉकडाऊन लावण्याबाबत चर्चा, मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली, महाराष्ट्राची धाकधूक वाढली


2. राज्यभरात सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत वीकेण्ड लॉकडाऊन, विनाकारण घराबाहेर न पडण्याचं जनतेला आवाहन, जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरुच राहणार


3. राज्यात पुन्हा एकदा रुग्णालयात अग्नितांडव, नागपुरात वेलट्रीट रुग्णालयात लागलेल्या आगीत तीन रुग्णांचा मृत्यू, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


4. विद्यार्थ्यांचं आरोग्य महत्त्वाचं, दहावी आणि बारावी शिक्षणमंत्र्यांचं मोठं वक्तव्य, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आता बोर्डाच्या परीक्षेच्या निर्णयाकडे लक्ष


5. पुरेशा डोसअभावी अनेक लसीकरण केंद्र ठप्प, मात्र पुण्याला थेट केंद्राकडून कोरोना लसीचा पुरवठा, लसीकरणावरुन राजकारण मात्र सुरु


6. नेत्यांना घरी जाऊन लस का, शरद पवारांचं नाव न घेता मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल, तर लसीकरण धोरण सर्वांसाठी समान असण्याची गरज व्यक्त


7. देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं निधन, भारत भालके यांच्यानंतर कोरोनामुळे निधन झालेले दुसरे विद्यमान आमदार


8. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांच्या पाठीशी खंबीरपणे उभे न राहिल्याने शरद पवारांकडून खरडपट्टी, सूत्रांची माहिती तर सिल्वर ओकवरील बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा


9. मैदानात शांत आणि संयमी असणाऱ्या राहुल द्रविडचं जाहिरातीत रौद्ररुप, विराट कोहलीसह अनेकांकडून ट्वीट करुन मजेशीर प्रतिक्रिया


10. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरचा मुंबई इंडियन्सवर 2 विकेट्सने रोमहर्षक विजय, सलामीच्या सामन्यात पराभूत होण्याची मुंबई इंडियन्सची परंपरा कायम