- अभिनेत्री कंगना रनौतच्या दुसऱ्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह, आज मुंबईला येणार, मंढीहून चंदीगडसाठी रवाना
- ‘ना डरूंगी, ना झुकूँगी’, मुंबईत येण्यापूर्वी कंगना रनौतचं ट्वीट; महाराष्ट्र सरकारला कंगनाचं आव्हान
- ड्रग्स कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज फेटाळला, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; आज भायखळा कारागृहात रवानगी
- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून शाळांबाबत नियमावली जाहीर, येत्या 21 सप्टेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरु होणार
- रात्री चालणारी कामं आम्ही दिवसाढवळ्या करतोय, आरेतील वृक्षतोडीवरुन मुख्यमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला
- वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सांगली आणि कोल्हापुरात जनता कर्फ्युचं आवाहन; सागंली, कोल्हापुरात 11 तारखेपासून 21 तारखेपर्यंत जनता कर्फ्यु
- राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 9 लाख 43 हजारांवर; काल दिवसभरात 20 हजार 131 नव्या रुग्णांची भर
- कोल्हापूरच्या पन्हाळा आणि करवीर तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, रस्त्यांना ओढ्याचं स्वरुप; उपनगरातही पावसाचा जोर कायम
- परभणीच्या निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सुर्यवंशींना लाच घेतल्याप्रकरणी ACB कडून अटक
- चीनच्या जवानांकडून भारतीय सैन्याला पुन्हा चिथावण्याचा प्रयत्न, भाले आणि घातक शस्त्रधारी चीनी सैन्याचा फोटो व्हायरल