स्मार्ट बुलेटिन | 09 नोव्हेंबर 2020 | सोमवार | एबीपी माझा


अर्णब गोस्वामींनी कोठडीत मोबाईल वापरल्याची माहिती; खातेनिहाय चौकशी सुरु, अंतरिम दिलासा याचिकेवर आज हायकोर्टात फैसला

दिवाळीनंतर नियमावली तयार करुन मंदिरं उघडणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं सुतोवाच, फटाकेबंदीवरही केलं भाष्य


पदवीधर अन् शिक्षक विधान परिषद निवडणुकीवरुन महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता, अजूनही जागांचे वाटप ठरले नाही

मागच्या सुनावणीत एवढा घोळ घातला, आता विश्वास नाही; मराठा आरक्षण एल्गार मेळाव्यात खासदार संभाजीराजे कडाडले

एसटी कर्मचाऱ्यांचं तीन महिन्यांचं वेतन थकीत, एसटी कामगार संघटनेचं आज राज्यभर आक्रोश आंदोलन

झाडीपट्टी कलाकारांची दिवाळी अंधारात, शासनाने कार्यक्रम सुरु करण्याची परवानगी देण्याची मागणी

व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती, कोल्हापुरात गेल्याची माहिती

जगभरात कोरोना रुग्णांचा आकडा 5 कोटी पार, 24 तासात 4.69 लाख नवीन केसेस तर 5762 जणांचा मृत्यू

व्हाईट हाऊस सोडताच मेलानिया ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प यांना घटस्फोट देणार, अमेरिकन मीडियाचा दावा

सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत दिल्ली कॅपिटल्सची फायनलमध्ये धडक, उद्या मुंबई-दिल्लीमध्ये आयपीएल फायनल