देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. आज देशभरात कोविड लसीकरणाची रंगीत तालीम, महाराष्ट्रात 30 जिल्हे आणि 25 महापालिका क्षेत्रांमध्ये ड्राय रनची तयारी पूर्ण


2. ऐन थंडीत मुंबई, पुणे, नाशिक आणि कोकणात अवकाळी पावसाची हजेरी, द्राक्ष आणि आंब्यासह अनेक पिकांना फटका, शेतकरी चिंतातूर


3. पोलीस भरतीचा जीआर तीन दिवसांतच रद्द, अनिल देशमुख यांची घोषणा, एसईबीसी उमेदवारांसाठी सरकार शुद्धीपत्रक काढणार


4. नाशिकमध्ये भाजपला मोठं खिंडार पडण्याची शक्यता, वसंत गीते, सुनील बागुल शिवसेनेच्या वाटेवर, आज पक्षप्रवेशाची शक्यता


5. कोकणातले आताचे मुस्लीम हे पूर्वाश्रमीचे दाते आणि गाडगीळ होते, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर ब्राह्मण महासंघाचा आक्षेप, आज आंदोलन करणार


6. कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीचे अधिकार राज्यांना देण्यासंदर्भात हालचाली, आज सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये नववी बैठक, बाबा लक्खांसोबतच्या बैठकीत कृषीमंत्र्यांना अश्रू अनावर


7. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याची आवश्यकता नाही, मराठा आरक्षणाबाबत सह्याद्री अतिथी गृहावरील बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विनायक मेटेंना सुनावलं


8. महाराष्ट्रात रस्तेविकासाठी पाच हजार कोटींचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर नितीन गडकरींची घोषणा, मुंबई-गोवा हायवे एका वर्षात पूर्ण करणार


9. कोरोना संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम, यंदा भारताचा जीडीपी 7.7 टक्के घसरण्याचा अंदाज


10. अॅमेझॉनच्या जेफ बेजोस यांना मागे टाकून टेस्ला, स्पेस एक्सचे संस्थापक इलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्समध्ये मस्क अग्रस्थानी