देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. विधानपरिषदेसाठी राज्यपालनियुक्त १२ नावांची यादी जाहीर, शिवसेनेकडून उर्मिला तर राष्ट्रवादीकडून खडसेंना संधी, काँग्रेसच्या सचिन सावंतांनाही उमेदवारी
2. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान मातोश्रीवर मराठा संघटनांचा मराठा मोर्चा धडकणार, तर आज पंढरपुरातून आक्रोश मोर्चालाही सुरुवात, पंढरपुरात संचारबंदीचे आदेश
3. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा; एकनाथ खडसेंची देवेंद्र फडणवीसांवर नाव न घेता टीका, पक्षाने एकाच व्यक्तीचे लाड केल्याने मिळालेली सत्ताही गेली, खडसेंचा निशाणा
4. शिक्षक-विद्यार्थ्यांना आता पाच ऐवजी 14 दिवसांची दिवाळी सुट्टी, दिवाळीनंतर नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा प्रयत्न, शिक्षणमंत्र्यांची माहिती
5. राज्यात खासगी बस संपूर्ण प्रवासी क्षमतेने धावणार, दिवाळीनिमित्त राज्य सरकारचा मोठा निर्णय, मास्क असेल तरच बसमध्ये प्रवेश
6. बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील 78 जागांसाठी आज मतदान, 33 हजार 782 मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा
7. अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणुकीचा आज निकाल लागण्याची शक्यता, जो बायडन यांचा विजय जवळपास निश्चित
8. श्रीहरिकोटामधून दुपारी 1 वाजून 02 मिनिटांनी PSLV-C49 उपग्रहाचं प्रक्षेपण होणार, शत्रू राष्ट्रांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी उपयोग
9. सोशल मीडियावर न्यूड फोटो शेअर करणं मिलिंद सोमण यांना महागात, अश्लीलता पसरवल्याप्रकरणी गोव्यातील वास्को पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
10. सनरायझर्ज हैदराबादची ऑरेंज आर्मी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध क्वॉलिफायरचा दुसरा सामना खेळणार, एलिमिनेटरमध्ये हैदराबादची बंगलोरवर मात