स्मार्ट बुलेटिन | 5 जून 2019 | बुधवार | एबीपी माझा

1. रमजान ईदनिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण, मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज पठण, बाजारपेठांमध्येही रेलचेल

2. पुढील दोन दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होणार, बळीराजासाठी आनंदाची बातमी, तर मराठवाड्यात मंगळवारी अवकाळी पावसाने दिलासा

3. विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना नाराज, 144 जागांसाठी शिवसेना आग्रही असल्याची चर्चा, तर सर्वकाही आलबेल असल्याचा आदित्य ठाकरेंचा दावा

4. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमीपूजन जुलै महिन्यात, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची तयारी

5. शाळकरी मुलांचे गणवेश थेट लाभार्थी योजनेतून वगळले, यापुढे मुलांच्या बँक खात्यावर पैसे जमा होणार नाहीत, शालेय शिक्षण आणि क्रिडा विभागाचा निर्णय



6. बुलडाण्यातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा 'वंचित'च्या वाटेवर असल्याची चर्चा, मंगळवारी प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट

7. अंबरनाथमधील केक शॉपमध्ये केकमध्ये अळी आढळल्याने खळबळ, षडयंत्र असल्याचा केक विक्रेत्याचा दावा, गुन्हा दाखल

8. झोपडपट्टी पूनर्वसन योजनेची अंमलबजावणी काळानुसार बदलायला हवी, मुंबई उच्च न्यायालयाकडून सरकारची कानउघडणी

9. ईदच्या निमित्ताने सलमान खानचा भारत चित्रपट आज प्रदर्शित, चाहत्यांमध्ये उत्साह, देशभरात 5300 स्क्रीन्स सज्ज

10. विराट कोहलीची टीम इंडिया विश्वचषकातील पहिल्या आव्हानासाठी सज्ज, दक्षिण आफ्रिकेविरोधात आज सलामीचा सामना